12वीच्या निकालासाठी असा असणार फॉर्म्युला

129

कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य तिस-या लाटेची भीती लक्षात घेता, 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. पण परीक्षा होणार नसल्याने मूल्यांरनाच्या बाबतीत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम होता. आता शालेय शिक्षण विभागाने 12वीच्या निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. 10वी, 11वी आणि 12वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर 12वीचा निकाल लावण्यात येणार आहे. 10वी साठी 30 टक्के, 11वी साठी 30 टक्के आणि 12वी साठी 40 टक्के असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.

असा आहे फॉर्म्युला

10वी च्या परीक्षेत ज्या तीन विषयांत विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळवले आहेत, त्या विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांची मोजणी करण्यात येणार आहे. 12वी साठी 40 टक्के भारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या आणि तत्सम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

(हेही वाचाः आता अधिकाऱ्यांमुळे बारावीच्या निकालाला होणार उशीर?)

12वीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

12वी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यालयांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. 12वीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पहायला मिळेल.

(हेही वाचाः राज्याचा बारावीचा फॉर्म्युला ‘३०:३०:४०’? ‘त्या’ विद्यार्थ्यांवर होणार अन्याय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.