कोरोना काळात बाधित झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदाच्या वर्षी रितसर झाल्या. आता या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षांच्या निकालाबाबत संकेत दिले आहेत. यात इयत्ता १२ वीचा निकाल १० जून रोजी, तर इयत्ता १०वीचा निकाल २५ जूनपर्यंत लागण्याचे संकेत मंत्री गायकवाड यांनी दिले आहेत.
बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात आहेत. काही अहवालांमध्ये जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, तर काहींमध्ये 10 जूनपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचा दावा केला जातो. पण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी अधिकृतपणे बारावीचा निकाल कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 12 वीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती दिली.
बारावीचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येणार
- www.maharesult.nic.in
- www.maharesult.nic.in
- msbshse.co.in
- hscresult.11thadmission.org.in
- hscresult.mkcl.org
- mahresult.nic.in