10th, 12th Exam Date : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी – बारावी परीक्षेची तारीख ठरली

217
10th, 12th Exam Date : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी - बारावी परीक्षेची तारीख ठरली

दहावी, बारावीच्या (10th, 12th Exam Date) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीची लेखी (10th, 12th Exam Date) परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी-मार्च २०२४मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे.

(हेही वाचा – Pune Metro : गणपतीत मेट्रो १२ वाजेपर्यंत सुरु ठेवा)

तसेच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दहावी-बारावीच्या परीक्षेचे (10th, 12th Exam Date) संपूर्ण वेळापत्रक पाहता येणार आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.

सध्या वेबसाईटवरील वेळापत्रक (10th, 12th Exam Date) हे तात्पुरते असणार आहे. परीक्षेच्या आधी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन देखील मंडळाकडून करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.