कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द करून १०वी, ११वी आणि १२वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापन करून तयार करण्यात आलेल्या यंदाच्या १२वीचा निकाल मंगळवार, ३ ऑगस्ट रोजी लागणार आहे. तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उघड होणार आहे. सायंकाळी ४ वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
यंदाच्या वर्षी १२वीसाठी १४ लाख विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी बोर्डाने कनिष्ठ महाविद्यालयांना बोर्डाकडे निकाल सादर करण्यासाठी २३ जुलै ही अंतिम मुदत दिली होती.
(हेही वाचा : १२वीच्या १६ लाख विद्यार्थ्यांचा अवघ्या १७ दिवसांत निकाल तयार होणार!)
या संकेतस्थळांवर दिसणार निकाल
https://hscresult.11thadmission.org.in
दहावीसारखा गोंधळ न होण्यासाठी खबरदारी!
१०वीचा निकाल लागला होता तेव्हा सर्व संकेतस्थळे बंद पडली होती, ६ तास ती बंद पडली होती. त्यामुळे १२वीच्या निकालाच्या वेळी असा गोंधळ होऊ नये म्हणून यंदा बोर्डाने ५ संकेतस्थळांवरून १२वीचा निकाल जाहीर करणार आहे.
Join Our WhatsApp Community📢 𝐈𝐦𝐩 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐦𝐞𝐧𝐭: The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results of Std 12th, 2021 batch on 3rd August at 4pm. Best of luck to all students. #HSC #results #InternalAssessment @CMOMaharashtra @msbshse pic.twitter.com/kfNBZNGFyh
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) August 2, 2021