परीक्षा केंद्रावर उशिरा जाल तर परीक्षेला मुकाल; दहावी-बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना सूचना

109

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २१ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान दहावी(SSC) आणि बारावी(HSC) च्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षांबाबत मंडळाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या संदर्भातील परिपत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे. या सूचना विदयार्थी आणि सर्व केंद्रांना लागू आहेत. परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहचल्यासही परीक्षेला बसू दिले जात असल्याने, विद्यार्थी याचा गैरफायदा घेत असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आल्याने, आता परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.

( हेही वाचा: परशुराम घाटात दरड रस्त्यावर; मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प )

राज्य शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या सूचना:

  • दहावी-बारावी परीक्षांच्या पेपरची वेळ सकाळ सत्रासाठी ११ वाजता तर दुपारी ३ वाजता अशी आहे. यासाठी विदयार्थांनी ३० मिनिटे आधी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहावे. आतापर्यंत अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाला असला तरी, विद्यार्थ्यांना पेपरला परवानगी देण्यात येत होती. परंतु राज्य मंडळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश केंद्रांना दिले आहेत. परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
  • परीक्षेस विद्यार्थ्याऐवजी तोतया व्यक्ती बसली आहे. हे परीक्षेदरम्यान किवा परीक्षेनंतर उघड झाल्यास संबंधीत दोन्ही व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल.
  • विदयार्थी कॉपी प्रकरणात अढळल्यास त्याला संबंधित विषयाची परीक्षा देता येणार नाही.
  • परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चोरी करणे, विकणे किवा मोबाईलमार्फत प्रसारित केल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील पाच परीक्षांसाठी प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.