वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP Number Plate, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसविणे अनिवार्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशानुसार ०१.०४.२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार ०१.०४.२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Bike Sale Mumbai : मुंबईच्या रस्त्यांवर वाढत आहेत दुचाकी; विक्रीमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ)
नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि. ०१ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय (Regional Transport Office), मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहन धारकांना त्यांच्या वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता मे. रिअल मेझोन इंडिया प्रा. ली. ही एजेंसी निश्चित करण्यात आलेली असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे.
वाहन धारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेवून नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी. वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला तरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
वाहनधारकांना त्यांच्या वाहनांकर ही नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात दाखल करु शकतात.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहन धारक व नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी (HSRP Number Plate) नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे.
ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मुंबई (मध्य) यांनी कळविले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community