HSRP New Deadline: वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली; ‘ही’ आहे अंतिम तारिख

104
HSRP New Deadline: वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली; 'ही' आहे अंतिम तारिख
HSRP New Deadline: वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत वाढवली; 'ही' आहे अंतिम तारिख

HSRP New Deadline : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनांना बसवणं आता शासनानं बंधनकारक केलं आहे. त्यानुसार २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यासाठी सध्या राज्यात मोहिम सुरु आहे. यासाठी ३० मार्च २०२५ ही डेडलाईन देण्यात आली होती. पण ही डेडलाईन संपायला केवळ दहाच दिवस शिल्लक असताना आता याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनानं यासाठीचं परिपत्रक काढलं आहे. (HSRP New Deadline)

आतापर्यंत किती वाहनांना बसवली HSRP नंबर प्लेट
एसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता 30 जून ही नवी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवता येणार आहे. आतापर्यंत काहीच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्तांनी (Transport Commissioner) दिली. आतापर्यंत सुमारे 18 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अनेक वाहनधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Delhi High Court च्या न्यायमूर्तींच्या बंगल्यात सापडली रोख रक्कम; आग लागल्यावर अग्नीशमन दलाला सापडले घबाड)

एचएसआरपी नंबर प्लेटचे वैशिष्ट्ये
एचएसआरपी नंबर प्लेट ही एक वाहनावर घट्ट बसवली जाणारी विशेष प्रकारची हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे. यात काही खास फीचर्स आहेत. छेडछाड रोखण्यासाठी क्रोमियम बेस्ड होलोग्राम, वाहनाचा 10 अंकी युनिक कोड, लेसर-ब्रँडिंग आणि प्रेस्ड नंबर्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही प्लेट ती टॅम्पर-प्रूफ असते. ती एकदा वाहनावर लावली की सहज निघत नाही, वाहनाला नुकसान न पोहोचवता ती काढणे कठीण असते.

एचएसआरपी नंबर प्लेट वापरण्याचे फायदे

  • हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तोडल्याशिवाय बदलता येत नाहीत.
  • यात एक कोडिंग सिस्टम आहे. ते स्कॅन केल्यास वाहनाशी संबंधित माहिती लगेच उपलब्ध होते.
  • हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर लिहिलेल्या नोंदणी क्रमांकात कोणताही बदल करता येणार नाही आणि केल्यास ते खराब होते.
  • ही नंबर प्लेट लगेचच हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यांच्या नजरेत येते.
  • यावरील क्यूआर कोडमधून डेटा वाचणे सोपे आहे.
  • अपघात झाल्यास वाहन मालकाची संपूर्ण माहिती क्यूआर कोडद्वारे काही सेकंदात उपलब्ध होते.
  • या नंबर प्लेटमुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसेल.(हेही वाचा – Vidhan Bhavan Library: विधानभवनातील मंत्र्यांच्या दालनाचे नूतनीकरण; ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ मात्र अडगळीत)

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स किती शुल्क लागेल? (HSRP Plate Fee)

  • दुचाकी आणि ट्रॅक्टर : 450 रुपये आणि जीएसटी
  • तीनचाकी वाहन: 500 रुपये आणि जीएसटी
  • चारचाकी आणि इतर वाहन: 745 रुपये आणि जीएसटी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.