वाराणसी येथील ज्ञानवापी (Gyanvapi) परिसरातील तळघरात हिंदू देवतांच्या मूर्ती सापडल्या, त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंदिरासाठी मंदिराचे अवशेष वापरण्यात आले आहेत, असा भारतीय पुरातत्व विभागाने अहवाल दिला. त्यावर वाराणसी न्यायालयाने येथील तळघरात हिंदूंना पूजा आणि दर्शनासाठी परवानगी देण्यात यावी, असा निर्णय दिला, त्यानंतर हा भाग हिंदूंसाठी खुला करताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू भाविक दर्शनासाठी येऊ लागले आहेत.
तीस वर्षांनंतर व्यास तळघराचे दरवाजे उघडण्यात आले
तळघरात गौरी गणेशाची पूजा करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार, पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने व्यास तळघरातील पूजा-आरतीबाबत वेळापत्रकही जारी केले आहे. 31 जानेवारी रोजी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी व्यास कुटुंबीय शैलेंद्र कुमार पाठक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली. यानंतर सूमारे तीस वर्षांनंतर व्यास तळघराचे दरवाजे उघडण्यात आले. यानंतर लगेच तिथे पुजारींनी गौरी-गणेशाची पूजा केली. आता व्यास कुटुंब आणि काशी विश्वनाथ टेंपल ट्रस्ट तिथे नियमित पूजा करणार आहेत.
Join Our WhatsApp Community