Coal Ministry : देशात विजेची प्रचंड मागणी, तरी औष्णिक प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा साठा उपलब्ध

114
Coal Ministry : देशात विजेची प्रचंड मागणी, तरी औष्णिक प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा साठा उपलब्ध

देशात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असतानाही, औष्णिक वीज प्रकल्पातील कोळशाचा (Coal) सद्यस्थितीतला साठा ४५ मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याचे कोळसा मंत्रालयाने (Coal Ministry) म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा ३० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे मंत्रालयाने कळवले आहे. देशाची १९ दिवसांची गरज भागविण्यासाठी हा साठा पुरेसा असेल. मे २०२४ महिन्यात औष्णिक वीज केंद्रात दररोज सरासरी केवळ १०,००० टन कोळसा वापरात आला. कोळशाचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा करता यावा यासाठी वाहतूक आणि दळणवळ व्यवस्थेची सुनिश्चिती केल्यामुळे हे शक्य झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. (Coal Ministry)

ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय (Coal Ministry), रेल्वे मंत्रालय आणि वीज निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला उपगट नियोजनबद्धरित्या कार्यरत असून, पुरवठा साखळी कार्यक्षम राहावी यासाठीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोळशाच्या (Coal) उत्पादनात ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. खाणीतील कोळशाचा साठा १०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्यामुळे वीज उत्पादन क्षेत्राला पुरेसा कोळसा उपलब्ध करून देता आला आहे. कोळशाच्या वाहतूकीसाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मालगाड्यांच्या दैनंदिन उपलब्धतेत सरासरी ९ टक्के वाढ सुनिश्चित केली आहे. (Coal Ministry)

(हेही वाचा – POK पाकिस्तानचा भाग नाही; इस्लामाबाद हायकोर्टात पाक सरकारने केला खुलासा)

पारंपारिकरित्या पारादीप बंदरातूनच कोळशाची वाहतूक केली जात आहे, त्यामुळे सागरी मालवाहतूकीद्वारे कोळसा पुरवठा करण्याचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. कोळशाच्या वाहतूक आणि दळवळणीय धोरणानुसार योग्य समन्वय राखत धामरा आणि गंगावरण बंदरातूनही कोळशाची (Coal) वाहतूक केली जात आहे. रेल्वे मालवाहतूक व्यवस्थेत पायाभूत सुविधांची वाढ केली गेल्यामुळे सोन नगर ते दादरी पर्यंत रेल्वे मालगाड्यांची वाहतूक जलदरित्या व्हायला मोठी मदत झाली आहे. त्यामुळे कोळसा मालवाहतूकीसाठी लागणाऱ्या कालावधीत १०० टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा दिसून आली आहे. पावसाच्या हंगामात औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असायला हवा यासाठी कोळसा मंत्रालय (Coal Ministry) पूर्णतः सज्ज असल्याचे मंत्रायलाने म्हटले आहे. येत्या १ जुलै २०२४ रोजी औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये ४२ मेट्रिक टन कोळसा उपलब्ध होईल, असे मंत्रालयाने कळवले आहे. (Coal Ministry)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.