तुळशीच्या लग्नानंतर येत्या काळात येणारे लग्नाचे मुहूर्त यांमुळे नेहमीप्रमाणेच सोने-चांदीच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. याच पार्शअवभूमीवर आता एक आनंदाची बातमी मिळत आहे. बाजारात सोने-चांदीच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे विवाहइच्छुकांना याचा चांगलाच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
असे आहेत नवे दर
एचडीएफसी एनएसई सिक्युरिटीजनुसार, राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचे भाव हे 402 रुपयांनी कमी झाले आहेत. याआधी एक तोळे म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार 999 इतकी होती. ती घसरुन आता 50 हजार 597 इतकी झाली आहे. तर चांदीच्या दरांत मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. चांदीचा भाव 1 हजार 244 रुपयांनी कमी होऊन 58 हजार 111 इतका झाला आहे. याआधी चांदीचा दर 59 हजार 455 इतका होता.
(हेही वाचाः ‘इथे आमची गरजच काय?’, सीबीआय म्हणते या राज्यात एकही भ्रष्टाचाराची तक्रार नाही)
आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात घट झाल्यामुळे सोने-चांदी स्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर 1 हजार 628.7 डॉलर प्रति औंस इतका तर चांदीचा दर 19.15 डॉलर प्रति औंसवर बंद झाला आहे. छोट्या दरांत वाढ लागू करण्यास केंद्रीय बँक सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॉमेक्स सोन्याचे दरही घसरले आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिस्ट दिलीप परमार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community