म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांसाठी सोडतीला सोमवार, २३ मेपासून सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सोमवारी दुपारी २ वाजता या सोडतीचा शुभारंभ झाला. म्हाडाच्या या सोडतीला सुरुवातीलाच उदंड प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. शुभारंभानंतर अवघ्या १० मिनिटांमध्ये ११५ अर्जदारांनी अर्ज भरले. त्यानंतर सायंकाळपर्यंत ही अर्जदारांची संख्या ६५५ पर्यंत पोहोचली होती. पहिल्याच दिवशी ६५५ अर्जदारांपैकी २०८ अर्जदारांनी अनामत रक्कम सुद्धा भरली आहे.
(हेही वाचा – Samriddhi Highway : समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे ‘या’ दिवशी होणार लोकार्पण)
म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत अनेक कारणांमुळे लांबणीवर जात होती. अखेर मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते सोमवारी या घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात झाली. मुंबईतील या घरांच्या सोडतीत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे आहेत. २६ जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. २६ जूनपर्यंत आलेल्या अर्जदारांची सोडत १८ जुलैला वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.
या घरांच्या सोडतीसाठी नियमावली, मार्गदर्शक सूचना, पात्रतेचे निकष आणि आरक्षण प्रवर्ग यासंबंधीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community