मुंबईकरांना ‘फुकट’ नको, ‘विकत’ हवी… खासगी केंद्रांवरील लसीकरण जोरात

मुंबईकर जनता मोफतच्या मागे न धावता पैसे देऊन लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे.

170

मुंबईत मागील काही दिवसांपासून लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून, आजवर होणा-या सरासरी ५० हजार लसीकरणाच्या जागी, आता सरासरी ७० हजार एवढे लसीकरण होत आहे. मात्र, लसीकरणाचा वेग वाढत असला तरी महापालिका आणि शासकीय रुग्णालयांमधील लसीकरणाचा वेग मंदावताना दिसत आहे.

सध्या महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये केवळ २० ते २५ टक्केच लसीकरण होत असून, उर्वरित लसीकरण हे खासगी लसीकरण केंद्रांमध्ये शुल्क आकारुन होत आहे. त्यामुळे सध्या मोफत लसीकरणाऐवजी शुल्क आकारुन केल्या जाणा-या लसीकरणावरच अधिक भर असून, मुंबईकर जनता मोफतच्या मागे न धावता पैसे देऊन लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे.

(हेही वाचाः बापरे! कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या नावाखाली भलत्याच दिल्या लस! )

अशी आहे लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत मागील पंधरा दिवसांपासून लसीकरणाचा वेग वाढलेला दिसून येत आहे. मात्र, यामध्ये १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाचे प्रमाण ७० ते ७५ टक्के एवढे आहे. ८ जून रोजी मुंबईत सर्वाधिक ९६ हजार ८६० एवढे लसीकरण पार पडले. यामध्ये ५७ हजार लसीकरण हे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे असून, उर्वरित ४० हजार लसीकरण हे महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये झाले आहे.

महापालिका व शासकीय केंद्रांतील लसीकरण मंदावले

शासकीय व महापालिका केंद्रांत मोफत लसीकरण होत आहे. त्यामुळे ४५ ते ६० वर्षे आणि त्यापुढील व्यक्तींचे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांचे मोफत लसीकरण केले जाते. तर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे मागील दहा ते बारा दिवसांमधील लसीकरणाची आकडेवारी पाहिल्यास या मोहिमेला वेग दिसून येत असला, तरी हा वेग १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचा आहे. यासाठी शुल्क मोजले जात असून, महापालिका व शासकीय केंद्रातील मोफत लसीकरणाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे.

(हेही वाचाः पुढचा आठवडा मुंबईकरांसाठी धोक्याचा… काय आहे कारण?)

गेल्या काही दिवसांतील लसीकरण

०४ जून: एकूण लसीकरण-८८,५२७ (१८ ते ४४ वर्षे : ६४,६३६)

०५ जून : एकूण लसीकरण -७४,६५५ (१८ ते ४४ वर्षे : ४९,२२१)

०७ जून : एकूण लसीकरण -९४,९४१ (१८ ते ४४ वर्षे : ६३,९६८)

०८ जून : एकूण लसीकरण -९६,८६० (१८ ते ४४ वर्षे : ५७,३३७)

०९ जून : एकूण लसीकरण -५०,८०७ (१८ ते ४४ वर्षे : ३५,२००)

१० जून : एकूण लसीकरण -६९,७१३ (१८ ते ४४ वर्षे : ५१,७७८)

११ जून : एकूण लसीकरण -५३,४२७ (१८ ते ४४ वर्षे : ३८,६८२)

१२ जून : एकूण लसीकरण -७०,४६१ (१८ ते ४४ वर्षे : ५१,१२७)

१४ जून : एकूण लसीकरण -९३,९९७ (१८ ते ४४ वर्षे : ६८,६९२)

१५ जून : एकूण लसीकरण -७५,८६७ (१८ ते ४४ वर्षे : ४८,७३०)

१७ जून : एकूण लसीकरण -७०,११५ (१८ ते ४४ वर्षे : ४९,८५२)

(हेही वाचाः घरोघरी जाऊन लसीकरणासाठी उच्च न्यायालयाचा सरकारला अल्टिमेटम! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.