आठवड्याचा पहिला दिवस सुरू झाला आणि नोकरीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूकोंडीचा सामना करावा लागला. रविवारची सुट्टी संपल्यानंतर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ठाण्यातील चाकरमानी मुंबईच्या दिशेने कामावर जायला निघाले, मात्र त्यांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले.
ठाण्यातील तीन हात नाका पूल, आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा टोल नाका आणि अवजड वाहनांमुळे होत असलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईच्या दिशेने जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. साकेत पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतूक विभागाकडून जड-अवजड वाहनांसाठी नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं.
रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत तसेच दुपारी 12 ते 4 पर्यंत मुभा देण्यात आली होती, मात्र सर्रासपणे जड-अवजड वाहनांची कोंडी रस्त्यावर झाली होती. याचा नाहक त्रास चाकरमानी आणि रुग्णवाहिका यांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आज दिसत होते.
ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कोपरी येथील टोल नाक्याच्या अधिकाऱ्यांना टोल नाक्यावरील होणारे आताचे ट्रॅफिक टोल न घेता तात्काळ पुढे सोडण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community