मीरारोडमधील दांपत्याची वयाची पन्नाशी उलटण्याअगोदरच साथ सुटली. रस्त्यावर चालत असतानाच चारूता अजित मोरे यांना अचानक चक्कर आली. ब्रेन हेमरेजने चारुता यांना वयाच्या 46 व्या वर्षी जगाचा निरोप घ्यावा लागला. पत्नीच्या विरहाचं दुःख बाजूला सारत अजित मोरे यांनी चारुता यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि मरणानंतर त्यांचे अवयव दान केले. यामुळे चार जणांना नवी संजीवनी मिळाली.
अवयवदानाचा निर्णय
15 जुलै रोजी चारुता रस्त्यावर चक्कर येऊन पडल्या. एका अनोळखी इसमाने त्यांच्या आधारकार्डच्या माहितीचा आधार घेत त्यांना घरी पोहोचवले. चारुता यांचे पती अजित मोरे यांनी त्यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान ब्रेन हेमरेजमुळे त्यांना ब्रेनडेड घोषित केले. डॉक्टरांकडून आपल्या पत्नीबाबत समजताच अजित मोरे यांनी स्वतःहून अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आली. या अवयवदानामुळे चार जणांचे आयुष्य बहरले याचे समाधान अजित मोरे यांनी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Communityआम्ही दोघांनीही मृत्यूपश्चात अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मरणानंतर अवयव नष्ट करण्यापेक्षा गरजू रुग्णांना अवयव दान करावे. ही समाजपयोगी बाब आहे.
अजित मोरे, चारूता यांचे पती