हैदराबादमध्ये (Hyderabad) कट्टरपंथी जमावाने पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे. हा जमाव सोशल मीडियावर झालेल्या कथित इस्लामच्या अपमानाच्या पोस्टसंबधात जमले होते. कट्टरपंथींनी रात्रभर हैदराबादमध्ये (Hyderabad)वादग्रस्त नारेबाजी केली तसेच पोस्ट करणाऱ्याला अटक करण्याची मागणी केली. (Hyderabad)
( हेही वाचा : MVA चा फॉर्म्युला ८५-८५-८५, मग संजय राऊतांनी २७० हा आकडा आणला कुठून?)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ ऑक्टोबर रोजी हैदराबाद (Hyderabad)येथील रेन बाजार भागात कट्टरपंथी मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी त्यांनी सर तन से जुदाच्या घोषणाही दिल्या. तसेच इस्लामच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा दावाही जमावाने केला. मुळात हा जमाव एका व्यक्तींच्या घराबाहेर जमा झाला होता. त्यांच्यावर दबाव आणून धमकावण्यासाठी कट्टरपंथी जमा झाले होते.
कट्टरपंथी जमा झालेला परिसर याकुतपुरा येथील ब्राह्मणवाडी हा असून इथे गोंधळ घातल्याचे व्हायरल व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. यानंतर पोलिस फौजफाटाही मोठ्या प्रमाणात घटनास्थली दाखल झाला. त्यावेळी डोक्यावर नमाजी टोप्या घातलेल्या लोकांची गर्दी दिसत होती.दरम्यान रात्रभर हा गोंधळ सुरू होता. गर्दी पाहून पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. सकाळी हा गोंधळ संपला.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community