हैदराबादमधील रस्त्यांवर लवकरच सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग आणि सौर छत (सोलार रुफ) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हैदराबादच्या काही भागात या ‘मॉडेल कॉरिडोर’ प्रकल्पाची सुरूवात करण्यात येणार आहे. यामध्ये पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि बाजारपेठेच्या काही निवडक मार्गाचा समावेश आहे.
LB नगर, चंद्रयांगुट्ट, राजेंद्र नगर, मेहदीपट्टणम, खैराताबाद, सेंरिलिंगपल्ली आणि नानकरामगुडा भागांमध्ये एकूण २९ ‘मॉडेल कॉरिडोर’प्रकल्पांचे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.
हैदराबादच्या पश्चिम भागात २२ किमीच्या मार्गासाठी ORR च्या बाजूने ४.५ मीटर सायकल ट्रॅकची योजना आहे. हा ट्रॅक नानकरामगुडा ते तेलंगणा स्टेट पोलिस अकादमी पर्यंत ८.४५ किमी आहे, तर नरसिंगी ते कोल्लूर मार्गावर १३.८ किमीपर्यंत असणार आहे.
नियोजित सायकल ट्रॅकमध्ये सौर छतासह तीन लेन आणि दोन्ही बाजूला एक मीटर रुंदावर हिरव्या जागेचा समावेश आहे. सायकल ट्रॅक सौर छताद्वारे १६ मेगावॅट वीजनिर्मिती करता येणार आहे. या वीजनिर्मितीचा महामार्गावरील ऊर्जा साधनांसाठी केला जाईल. यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवडणुका होण्यापूर्वी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट आहे. ‘मॉडेल कॉरिडोर’ हा एकूण २१.५ किमी लांबीचा प्रकल्प ५६८.२ कोटी खर्च करुन उभारण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता चांगल्या पायाभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी अधिक आहे, असे जीएचएमएसीने सांगितले.
Join Our WhatsApp Community