Hydropower Projects : जलविद्युत प्रकल्प कामांतील अनियमितता : सीबीआयच्या मुंबईसह देशांत 30 हून अधिक ठिकाणांची झडती

Hydropower Projects : २३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 हून अधिक ठिकाणी झडती घेतली. प्रकल्पाशी संबंधित नागरी कामे देतांना ई-टेंडरिंगबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही, असाही आरोप कंपनीवर आहे.

173
Hydropower Projects : जलविद्युत प्रकल्प कामांतील अनियमितता : सीबीआयच्या मुंबईसह देशांत 30 हून अधिक ठिकाणांची झडती
Hydropower Projects : जलविद्युत प्रकल्प कामांतील अनियमितता : सीबीआयच्या मुंबईसह देशांत 30 हून अधिक ठिकाणांची झडती

जम्मू-काश्मीरमधील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या नागरी कामांमध्ये अनियमितता असल्याच्या आरोपाशी संबंधित प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून २३ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 हून अधिक ठिकाणी झडती घेतली. मुंबई, जम्मू, श्रीनगर, दिल्ली, गुरुग्राम, बागपत, नोएडा, पाटणा, जयपूर, जोधपूर, बारमेर, नागौर आणि चंदीगडसह विविध ठिकाणी ही झडती मोहीम सुरू आहे. (Hydropower Projects)

(हेही वाचा Farmers Protest : कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची किंमत चुकवावी लागणार; होणार ‘ही’ कारवाई)

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन नाही

चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (पी) लिमिटेड (Chenab Valley Power Projects, सीव्हीपीपीपीएल) ही कंपनी हा प्रकल्प विकसित करत आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध 20 एप्रिल 2022 रोजी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकल्पाशी संबंधित नागरी कामे देतांना ई-टेंडरिंगबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही, असाही आरोप कंपनीवर आहे.

फेरनिविदा काढण्याचा निर्णय

सीव्हीपीपीपीएलच्या 47 व्या बोर्डाच्या बैठकीत ई-टेंडरिंगद्वारे रिव्हर्स ऑक्शनद्वारे फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला. सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करायचा निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही, असा आरोपही केला गेला आहे. झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रोख ठेवी, मुदत ठेवींमधील गुंतवणूक, विविध शहरांमधील मालमत्ता गुंतवणूक, डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे जप्त करण्यात आले आहेत. (Hydropower Projects)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.