Hydroxychloroquine : ‘या’ औषधामुळे 6 देशांमध्ये 17 हजार मृत्यू; कोरोनाकाळात झाला सर्वाधिक वापर

276
Hydroxychloroquine : 'या' औषधामुळे 6 देशांमध्ये 17 हजार मृत्यू; कोरोनाकाळात झाला सर्वाधिक वापर
Hydroxychloroquine : 'या' औषधामुळे 6 देशांमध्ये 17 हजार मृत्यू; कोरोनाकाळात झाला सर्वाधिक वापर

कोरोनाकाळात Hydroxychloroquine (HCQ) या औषधाची विक्रमी विक्री झाली. आता एका फ्रेंच संशोधकाने केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फ्रेंच संशोधनाने मार्च 2020 ते जुलै 2020 दरम्यान म्हणजेच कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेल्या मृत्यूंच्या कारणांचा अभ्यास केला.

(हेही वाचा – Delhi Schools : दिल्लीत थंडीची लाट; आणखी पाच दिवस वाढवली शाळेची सुट्टी)

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) घेणारे कोरोना संक्रमित लोक अधिक आजारी असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. या रुग्णांचे हृदय व स्नायू कमकुवत असल्याचे आढळून आले. अहवालात म्हटले आहे की, अमेरिका, तुर्की, बेल्जियम, फ्रान्स, इटली आणि स्पेन या 6 देशांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) घेतल्याने 17 हजार लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेत (America) सर्वाधिक 12,739 मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये 1,895 मृत्यू, इटलीमध्ये 1,822 मृत्यू, बेल्जियममध्ये 240 मृत्यू, फ्रान्समध्ये 199 आणि तुर्कीमध्ये 95 मृत्यू झाले.

2020 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी याच औषधाची जाहिरात केली होती. ट्रम्प यांनी 21 मार्च 2020 रोजी एक ट्विट केले होते.

(हेही वाचा – Bangladesh Election 2024 : बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक; बीएनपीचा निवडणुकीवर बहिष्कार)

या ट्विटमध्ये म्हटले होते, ”हे एक चमत्कारिक औषध आहे. कोरोना (Corona) विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मी ते सतत घेत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता. यातून कोणीही मरणार नाही. एका कोरोनाबाधित महिलेने हे औषध घेतले आणि ती बरी झाली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आपत्कालीन परिस्थितीत या औषधाच्या वापरास मान्यता देऊन खूप चांगले काम केले आहे.”

औषधाच्या आपत्कालीन वापरावर बंदी

जून 2020 मध्ये, FDA ने आणीबाणीच्या वापरासाठी औषधावर बंदी घातली. एफडीएने न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या (New England Journal of Medicine) अभ्यासाचा हवाला दिला होता. अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविडवर एचसीक्यूचा कोणताही परिणाम होत नाही आणि यामुळे मृत्यूचा धोका लक्षणीय वाढतो.

FDA ने कोरोनासाठी नव्हे, तर मलेरिया, ल्युपस आणि संधिवाताच्या उपचारांसाठी मान्यता दिली होती. त्या वेळी कोरोना व्हायरस औषध नसल्यामुळे रुग्णालये रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine (HCQ)) देत होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.