-
ऋजुता लुकतुके
ह्युंदेईच्या एसयुव्ही (Hyundai Alcazar 2024) गाड्यांमध्ये अल्काझार ही गाडी क्रेटा आणि टक्सन यांच्या मधली आहे. याचवर्षी कंपनीने नवीन क्रेटा बाजारात आणली होती. आता काही महिन्यातच त्यांनी अल्काझारचं फेसलिफ्ट व्हर्जन आणलं आहे. आधीच्या गाडीच्या तुलनेत गाडीचं आतून बाहेरून रुपडं बदलण्यात आलंय. आणि काही तांत्रिक बदलही करण्यात आलेत. नवीन अल्काझार गाडी सहा किंवा सात जण बसू शकतील अशी मोठी आहे. तुम्ही तुम्हाला हवा तो पर्याय निवडायचा आहे. गाडीची सुरुवातीची किंमत १४.९९ लाख रुपये इतकी आहे.
(हेही वाचा- Coastal Road : दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची मार्गिका येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबर पासून होणार खुली )
एक्झिकिटिव्ह, सिग्नेचर, प्लॅटिनम आणि प्रेस्टिज अशा चार प्रकारांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. बाहेरून गाडीचा लुक बघितला तर काळ्या रंगाचं मोठं ग्रिल देण्यात आलंय. गाडीचे दिवे हे आता एलईडी आहेत. गाडीचे दिशादर्शक दिवेही एलईडीच आहेत. ही गाडी ४.५६० मीटर लांब आहे. तसंच १.८०० मीटर रुंदही आहे. त्यामुळे गाडीचा आकार हा एसयुव्हीच्या मानाने मोठा आणि सुखावणारा आहे. (Hyundai Alcazar 2024)
Comparing the bold new 2024 Hyundai Alcazar price with its rivals—who offers the best value? 💰🚗
Answer in the comments below!!👇👇
.
.
.#ALCAZAR #HyundaiALCAZAR #CarComparison #mghector #tatasafari #xuv700 #AutoPrices #VehicleValue #CarRivals #automotiveinsights #91wheels pic.twitter.com/6emb02ZXDl— 91Wheels.com (@91wheels) September 9, 2024
ही गाडी चक्क ९ रंगांमध्ये उपलब्ध आहे. गाडीची आतली बाजूही अत्याधुनिक पद्धतीने सजवली आहे. निळ्या आणि तपकिरी रंगातील सिट आहेत. तर चालकाच्या समोर १०.२ इंचांचा मोठा डिस्प्ले आणि तितक्याच आकाराचा मोठा मनोरंजन डिस्प्ले देण्यात आलाय. गाडीतील म्युझिक प्रणाली तगडी आहे. आणि बोस कंपनीच्या ८ स्पीकर्सशी ती जोडलेली आहे. चालकाच्या आणि सहचालकाच्या जवळ वायरलेस चार्जिंग आहेच. शिवाय मागे बसलेल्या प्रवाशांनाही वायरलेस चार्जिंगची सोय आहे. (Hyundai Alcazar 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community