लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) रविवार, २५ ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पंतप्रधान मोदींच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. जळगावमधील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा – २०२६ पर्यंत Naxalism संपवणार; केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आकडेवारी)
पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट
जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी खास मराठीतून ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी उद्या, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जारी केला जाणार आहे.”
केंद्र सरकारच्या लखपती दीदी (Lakhpati Didi) योजनेंतर्गत ११ लाख नवीन लखपती दीदींना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. पंतप्रधान मोदी लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलाशी संवादही करणार आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. मुंबईतील विविध विकास कामे आणि योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला होता. महायुती सरकारकडून योजनांच्या प्रचारावर भर दिला जात असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जळगावमधील कार्यक्रमात काय बोलणार, हेही महत्त्वाचे असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community