Shivraj Singh Chauhan : मी नाकारलेला नाही; शिवराजसिंह चौहान यांची पुण्यात स्पष्टोक्ती

Shivraj Singh Chauhan : मी राजकारणातून बाहेर पडलेलो नाही. अजून बरीच कामे बाकी आहेत, असे उद्गार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढले आहेत. पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात भारतीय छात्र संसदेत ते बोलत होते.

222
Shivraj Singh Chauhan : मी नाकारलेला नाही; शिवराजसिंह चौहान यांची पुण्यात स्पष्टोक्ती
Shivraj Singh Chauhan : मी नाकारलेला नाही; शिवराजसिंह चौहान यांची पुण्यात स्पष्टोक्ती

आज मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारलेला नाही. आजही मध्य प्रदेशातील जनता मला मामाच म्हणते. राजकारण केवळ पदासाठी नसते. मी राजकारणातून बाहेर पडलेलो नाही. अजून बरीच कामे बाकी आहेत, असे उद्गार मध्यप्रदेशचे (Madhya Pradesh) माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी काढले आहेत. पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात (MIT World Peace University) भारतीय छात्र संसदेचे (Bharatiya Chhatra Sansad) आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपीय कार्यक्रमात चौहान बोलत होते. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड (Vishwanath Karad), कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड (Rahul Karad) या वेळी उपस्थित होते.

(हेही वाचा – Devendra Fadanvis : शिवडी-न्हावा शेवा प्रकल्पाची संकल्पना १९७३ची, ४० वर्षांत काहीच झाले नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका)

रामलल्ला येतील आणि रामराज्यही येईल

शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय विश्लेषकांनी ‘भाजप निवडून येणार नाही’, असे वर्तवले होते. मी जिंकायचेच ठरवले होते. या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे उद्घाटन (Inauguration of Shri Ram Temple) होणार आहे. त्यामुळे इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर आता रामलल्ला येतील आणि रामराज्यही येणार आहे.

मुलींचा जन्मदर वाढला

मध्य प्रदेशात १००० मुलांमागे ९१२ मुली इतके कमी प्रमाण होते. मुलगी म्हणजे कुटुंबावरील भार असे मानले जायचे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही मुलींचे विवाह करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री झाल्यावर पहिली योजना लाडली लक्ष्मी योजना सुरू केली. मुलगी कुटुंबाला पैसे मिळवून देणारी ठरली. त्यामुळे मध्य प्रदेशात मुलींची संख्या वाढली. आज एक हजार मुलांमागे ९७६ मुली आहेत. मुलींनीच मला ‘मामा’ म्हणायला सुरुवात केली. लाडली बेहना योजनेची (Ladli Behna Yojana) देशात चर्चा आहे. ही योजना जनतेसाठी कल्याणकारी योजना आहे, असे चौहान पुढे म्हणाले. (Shivraj Singh Chauhan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.