राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्टला करण्यात आला, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा होती मात्र आता त्यांनी स्वत:च यावर स्पष्टीकरण दिले आहे.
( हेही वाचा : धक्कादायक! गेल्या पाच वर्षांत राजावाडी रुग्णालयातील रक्तपेढीतील 200 लीटर रक्त गेले वाया)
काय म्हणाले संजय शिरसाट?
“प्रत्येकाला वाटते की मी मंत्री व्हावे पण याचा अर्थ असा नाही मी नाराज आहे… मी नाराज नाही, पहिला विस्तार झालेला आहे आमच्या बरोबर जे लोक आले होते ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं होतं त्यांना आम्ही संधी दिली दुसऱ्या टप्प्यात सर्वांना संधी मिळेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी माझं बोलणं झालेलं आहे मी नाराज नाही योग्य वेळेला मुख्यमंत्री निर्णय घेतील माझा त्यांच्यावर विश्वास आहे” असे संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे अधिवेशनानंतर पुन्हा एकदा विस्तार होईल. आजचा मंत्रिमंडळ विस्तार पाहून तुम्हाला कळालं असेल सर्व आनंदी आहेत हे सरकार सुद्धा हेल्दी राहणार आहे, हे सरकार मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करेल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
सत्तेसाठी आम्ही बाहेर पडलो नाही
सत्तेसाठी आम्ही बाहेर पडलो नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगले सरकारला चालायला हवे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही नाराज नाही. असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community