मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली या बैठकीत माजी खासदार संभाजी राजे यांनी मराठा आरक्षण Maratha Reservation संदर्भातली बाजू मांडली आणि ते बैठकीतून बाहेर पडले.
मात्र, मराठी माध्यमांनी या संदर्भातल्या बातम्या संभाजी राजे बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले, अशा स्वरूपाच्या दिल्या. मात्र त्यासंदर्भातली वस्तुस्थिती स्वतः संभाजी राजे यांनीच माध्यमांसमोर स्पष्ट केली. आपला स्वराज्य पक्ष अद्याप रजिस्टर झालेला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीत जास्त वेळ बसून राहणे योग्य वाटले नाही म्हणून मराठा आरक्षणासंदर्भातली बाजू मांडून मी बाहेर आलो, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा Maratha Reservation अथवा कुणबी आरक्षणाचा नुसता जीआर काढून उपयोग नाही. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकले पाहिजे. त्या स्वरूपाचा तोडगा काढावा, अशी आपण सरकारला विनंती केल्याचे ते म्हणाले. मागासवर्गीय आयोग गठीत करावा यासाठी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या दोन्ही मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिली. पण अद्याप त्यांनी त्यापैकी कोणतेही काम केले नाही. जोपर्यंत मराठा समाजाला मागास ठरवता येणार नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणे कठीण आहे हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले, याची आठवण संभाजी राजे यांनी करून दिली.
Join Our WhatsApp Community