Supriya Sule : भुजबळांना मी उत्तर देऊ शकते पण….शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्यत्तर

आईने माझ्यावर केलेले संस्कार थोडेसे वेगळे आहेत

141
Supriya Sule : भुजबळांना मी उत्तर देऊ शकते पण....शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्यत्तर
Supriya Sule : भुजबळांना मी उत्तर देऊ शकते पण....शरद पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्यत्तर

केंद्रीय निवडणूक आयोगात पार पडलेल्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) उपस्थित होते. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) शरद पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, कोर्ट कचेरी करणार नाही आणि तेच आयोगात हजर होते. ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी कुणाची ? यावर सुनावणी पार पडली.

भुजबळ टीका करताना म्हणाले की, शरद पवार म्हणाले होते की, कोर्ट-कचेरी करणार नाही. तेच निवडणूक आयोगात हजर होते. शरद पवार म्हणतात, मी राष्ट्रवादीचा संस्थापक अध्यक्ष आहे. मग मीसु्द्धा संस्थापक प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्याच घरी राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवलं गेलं. मग, आमचाही यामध्ये खारीचा वाटा आहे की नाही?, असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना विचारला होता.

(हेही वाचा  – Students Ragging : धक्कादायक! पालघरमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांचे रॅगिंग, कानशिल आणि गुप्तांगावर मारहाण )

सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. ते वयाने मोठे असल्याने मी त्यांना उत्तर देणार नाही. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता, असा हल्लाबोल सुप्रिया सुळेंनी केला आहे. सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आईने माझ्यावर केलेले संस्कार थोडेसे वेगळे आहेत. ज्यांच्या ताटात एकत्र जेवलो, ते कधी विसरायचं नसतं. छगन भुजबळ सतत शरद पवारांवर टीका करतात. छगन भुजबळांना मी उत्तर देऊ शकते, पण मी उत्तर देणार नाही; कारण ते वयाने मोठे आहेत. माझ्या वयाचे असते, तर करारा जबाब दिला असता.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.