’मेट्रो मॅन’ म्हणून ख्याती प्राप्त झालेले I. Sridharan

I. Sridharan : इ. श्रीधरन यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळमधील कारुकापुथूर येथे हिंदू मल्याळी कुटुंबात झाला.

125
’मेट्रो मॅन’ म्हणून ख्याती प्राप्त झालेले I. Sridharan
’मेट्रो मॅन’ म्हणून ख्याती प्राप्त झालेले I. Sridharan

इलाट्टुवालापिल श्रीधरन म्हणजेच इ श्रीधरन (I. Sridharan) हे भारतातील केरळ राज्यातील एक भारतीय अभियंता आणि राजकारणी आहेत. १९९५ ते २०१२ दरम्यान त्यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे आणि या दरम्यान कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोच्या उभारणीत त्यांनी नेतृत्व केले आहे.(I. Sridharan)

(हेही वाचा- लेफ्टनंट जनरल Upendra Dwivedi होणार नवीन लष्करप्रमुख; 30 जूनला पदभार स्वीकारणार)

इ. श्रीधरन (I. Sridharan) यांचा जन्म १२ जून १९३२ रोजी केरळमधील कारुकापुथूर येथे हिंदू मल्याळी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कीझवेट्टिल नीलकंदन मूसाथ आणि आईचे नाव अम्मालुअम्मा असे होते. सुरुवातीच्या काळात श्रीधरन (I. Sridharan) यांनी सरकारी पॉलिटेक्निक, कोझिकोड येथे स्थापत्य अभियांत्रिकीचे लेक्चरर म्हणून काम केले. १९५३ मध्ये यूपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ते इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स मध्ये सामील झाले. डिसेंबर १९५४ मध्ये त्यांची पहिली नियुक्ती दक्षिण रेल्वेमध्ये प्रोबेशनरी असिस्टंट इंजिनीअर म्हणून झाली होती. (I. Sridharan)

त्यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काही काळ काम पाहिले होते. पुढे २०२१ मध्ये त्यांनी सक्रिय राजकारण सोडले. बांगलादेशच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ढाका मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेड नावाच्या ढाका मेट्रो प्राधिकरणाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. (I. Sridharan)

(हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये दहशतवादी हल्ले सुरुच; Doda मध्ये लष्करी तळावर केला गोळीबार)

सध्या ते ते माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे सदस्य आहेत. त्यांनी वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळेच त्यांना मेट्रो मॅन म्हटले जाते. त्यांना २००१ मध्ये भारत सरकारने पद्मश्री, २००८ मध्ये पद्मविभूषण, २००५ मध्ये फ्रान्स सरकारने चेव्हलियर डे ला लिजन ऑफ ऑनर आणि टाइम मासिकाने आशियातील हीरो म्हणून सन्मानित केले होते. (I. Sridharan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.