पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रथमच एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. त्यांनी झेरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांच्याशी त्यांच्या पीपल बाय डब्ल्यूटीएफ (People By WTF) या यूट्यूब चॅनलवर चर्चा केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर चर्चा केली. या पॉडकास्टमध्ये ते गोध्रा हत्याकांडाविषयी प्रथमच बोलले आहेत.
(हेही वाचा – श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणांच्या सर्व याचिकांवर Supreme Court मध्ये एकत्र सुनावणी होणार)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत (Nikhil Kamat) यांना मुलाखत दिली आहे. या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान मोदींनी या मुलाखतीदरम्यान अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी मोदी यांनी २००२ मधील गोध्रा ट्रेन जळीतकांडावर (Godhra train burning) भाष्य केले. ते म्हणाले, “गोध्रा हत्याकांड (2002 Gujarat riots) झाले, त्या वेळी मी आमदार होतो. २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार झालो आणि २७ फेब्रुवारी रोजी विधानसभेत दाखल झालो. गोध्रा ट्रेन जळीतकांड झाले, तेव्हा आमदार होऊन मी केवळ ३ दिवस झाले होते. आधी आम्हाला ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर हळहळू आम्हाला घातपाताच्या बातम्या मिळू लागल्या. मी तेव्हा सभागृहात होतो. मी खूप चिंतेत होतो. मला तिथल्या लोकांची खूप काळजी वाटत होती. नंतर मी सभागृहातून बाहेर पडलो आणि म्हणालो, मला गोध्राला जायचे आहे. मात्र, त्या वेळी एकच हेलिकॉप्टर होते. ते ओएनजीसीचे हेलिकॉप्टर होते. मला सांगण्यात आले की, ते सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे. कोणत्याही व्हीआयपीला त्या हेलिकॉप्टरमधून जाण्याची परवानगी देता येणार नाही, त्या वेळी मी म्हटले, मी स्वतःच्या जबाबदारीवर जाईन, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोध्रा हत्याकांडाची दाहकता व्यक्त केली.
“I’m not a VIP. I’m a common man. I’ll visit Godhra in a single-engine helicopter, even if it’s risky…”
PM Modi narrates incidents from his life and journey, explaining how he manages stress, anxiety and other such mental challenges. pic.twitter.com/dtLnhL3TGi
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 10, 2025
आजही वाईट वाटते
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) पुढे म्हणाले, “मी त्यांना म्हटलं, मी काही व्हीआयपी नाही. मी सामान्य नागरिक आहे. मला जाऊ द्या. मी स्वतःच्या जबाबदारीवर जाईन. माझं तिथल्या लोकांशी भांडण झालं. शेवटी मी त्यांना म्हटलं की, मी हवं तर तुम्हाला लिहून देतो. जे काही होईल, ती माझी जबाबदारी असेल. मी सिंगल इंजिन हेलिकॉप्टरने गोध्राला जाईन. त्यानंतर मी त्याच ओएनजीसीच्या सिंगल इंजिन हेलिकॉप्टरने गोध्रामध्ये पोहोचलो. तिथली दृश्ये पाहून मला खूप त्रास झाला. आजही वाईट वाटते. तिथे होरपळलेल्या मृतदेहांचा खच पडला होता. मला ते पाहून त्रास झाला. मात्र मला माहिती होते की, मी अशा पदावर आहे जिथे मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. मला स्वतःला सांभाळावे लागेल. मी त्यासाठी जे काही करू शकत होतो, ते केलं आणि स्वतःला सावरलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community