विवेकी व प्रगल्भ, समाज घडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन तयार करणं, ही आज मोठी गरज आहे. याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे विज्ञानविषयक लेखन करुन विज्ञान विषयात रस वाढवणं, विज्ञानाविषयी जनजागृती करणं!
म्हणूनच i-Transform आयोजित करत आहे. ऑनलाईन विज्ञान साहित्य लेखन कार्यशाळा!!
▪विज्ञान विषयक लेखन करण्यासाठी आवश्यक तयारी काय असावी?
▪कथा, लेख, स्फुट लेखन करण्यासाठी विषय कसा निवडावा?
▪विषय मांडावा कसा? विज्ञान विषयक माहिती रंजक पद्धतीने कशी देता येईल?
▪विज्ञान कथा लिहिताना कसा विचार करावा?
▪किशोरवयीन मुलांसाठी विज्ञान लेखन कसं करता येईल?
अशा अनेक बाजूंनी विज्ञान लेखनाचा परामर्श घेत सविस्तर माहिती देणारी ही कार्यशाळा आहे. मराठी साहित्यातील नामवंत व ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर आणि डॉ. मेघश्री दळवी यात मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मश्री डाॅ.रोहिणी गोडबोले या कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत. तसंच कार्यशाळेत लेखन प्रात्यक्षिक करवून घेऊन ते तज्ज्ञ तपासूनही देणार आहेत.
कार्यशाळेचा तपशील खालीलप्रमाणे आहे
- दिनांक- ९ एप्रिल ते १२ एप्रिल
- वेळ- संध्याकाळी ८ ते १०
- स्थळ- झूम/गुगल मीट
- शुल्क – १३९९
➡नोंदणीसाठी खालील गुगल फॉर्म भरावा.
https://forms.gle/SUU6adRakGtcsz3V6
कार्यशाळेत सहभागी होणा-यांना इ-प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात देण्यात येईल.
Join Our WhatsApp Community