IAF Agniveer Result 2022: अग्निपथ योजना 2022 चा निकाल जाहीर; असा चेक करा निकाल

102

भारतीय वायू दलाने अग्निपथ भरती योजना 2022 चा निकाल जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचे निकाल ऑनलाईन उपलब्ध आहेत. अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात. 24 ते 30 जुलै 2022 दरम्यान फेज 1 परीक्षेत भाग घेतला होता त्यांचे निकाल लागले आहेत.

( हेही वाचा: राज्य पोलीस दलात 29 हजार पदे रिक्त; 9 नोव्हेंबरपर्यंत पदे भरण्याच्या सूचना )

CASB IAF Agniveer Result 2022: असा तपासा निकाल

  • उमेदवारांना भारतीय हवाई दल अग्निपथ भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल
    agnipathvayu.cdac.in.
  • मुख्यपृष्ठावरील लाॅगिन टॅबवर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल.
  • आता लाॅगिन करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाका.
  • तुमचा निकाल 2022 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • भविष्यात संदर्भासाठी त्यांची एक प्रत डाऊनलोड करा आणि प्रिंटआऊट घ्या.

7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त

IAF अग्निवीर भरती 2022 साठी 7 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. CASB निकालाच्या घोषणेनंतर, उमेदवारांनी पुढील फेरीसाठी तयारी करणे आवश्यक आहे. IAF मध्ये अग्निवीरांची अंतिम नावनोंदणी डिसेंबर 2022 पासून सुरु होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.