जम्मू-काश्मीर पोलिसांनी भारतीय वायू दलातील एका महिला फ्लाइंग अधिकाऱ्याच्या तक्रारीवर वायूदलाच्या स्थानकातील विंग कमांडरविरोधात (IAF Wing Commander) गुन्हा दाखल केला आहे. श्रीनगर येथील वायूदलाच्या मुख्यालयात जाऊन विंग कमांडरने बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार महिला अधिकाऱ्याने दाखल केली होती. या प्रकरणी वायूदलाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरमधील वायूदलाच्या स्थानकात ही घटना घडल्याचे महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
(हेही वाचा – Navi Mumbai Municipal Corporation पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी)
नववर्षानिमित्त मेजवानीच्या वेळी केला छळ
३१ डिसेंबर २०२३ या दिवशी वायूदलाच्या श्रीनगर स्थानकात नववर्षानिमित्त मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हाच विंग कमांडरने बलात्कार, लैंगिक छळ, मानसिक छळ आणि पाठलाग केला, असे आरोप करण्यात आले आहेत. विंग कमांडरने तिला त्याच्या खोलीत बोलावलं व हे दुष्कृत्य केल्याचे महिलेने सांगितले. बडगाम पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (२) अंतर्गत वायू दलाच्या विंग कमांडरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम वरिष्ठ पदावरील व्यक्तींसाठी आहे.
अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद
पीडित महिला अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (IAF Wing Commander)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community