IAS अधिकारी Tukaram Mundhe यांची पुन्हा बदली; ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे आदेश!

317
IAS अधिकारी Tukaram Mundhe यांची पुन्हा बदली; ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे मंत्रालयाकडून आदेश!

भारतीय प्रशासकीय सेवेत (Indian Administrative Service) ऑगस्ट 2005 पासून कार्यरत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची पुन्हा एकदा बदली करण्याचे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे (Additional Chief Secretary Nitin Gadre) यांच्या सहीने तुकाराम मुंडे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. राजकीय नेत्यांसोबत खटके उडत असल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणून त्यांची आधीच महाराष्ट्राला ओळख आहे. मात्र, त्याच बरोबरच कर्तव्यदक्ष आणि शिष्तप्रिय अधिकारी म्हणूनही महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांच्या याच स्वभामुळे त्यांची वारंवार बदली करण्यात येते. गेल्या वर्षीच पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी त्यांची बदल करण्यात आली होती. तसेच आता मुंढे यांची विकास आयुक्त, असंघटित कामगार (Development Commissioner, Unorganized Workers) या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  (Tukaram Mundhe)

(हेही वाचा – India’s Fielding Coach : भारताच्या क्षेत्ररक्षणाच्या प्रशिक्षक पदासाठी ‘या’ दिग्गज खेळाडूच्या नावाची चर्चा)

कायमच चर्चेत राहिलेले तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी ऑगस्ट 2005 मध्ये प्रशासकीय सेवेला सुरूवात केली होती. तेव्हापासूनच त्यांची कारकीर्द गाजली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या 19 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची 20 वेळा बदली झाली आहे. आता त्यात आणखी एका बदलीची भर पडली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्यात एक वर्ष आणि त्या आधी एक वर्ष त्यांनी मराठी भाषा विभागात काम पाहिले आहे. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार खात्याचे काम देण्यात आले आहे. (Tukaram Mundhe)

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Parishad 2024: निवडणूक आयोगाकडून घोषणा; विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान)

तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांसाठी नावे पुढीलप्रमाणे – 

अधिकाऱ्यांची नावे आणि मिळालेली जबाबदारी पहा….

  • तुकाराम मुंडे – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
  • रणजीत कुमार – अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणे
  • नीमा अरोरा – सह आयुक्त वस्तू व सेवा कर, मुंबई
  • व्ही राधा – प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
  • अमन मित्तल – सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन-मित्र, मुंबई
  • अमगोथू श्रीरंगा नायक – आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई
  • रोहन घुगे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (ठाणे)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.