वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedekar) प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र देऊन आयएएस अधिकारी झाल्याचा आरोप होत असतानाच आता पूजा खेडकर यांच्याबाबतच अजून एक प्रकरण समोर आलं आहे. पूजा खेडकर या मानसिक आजारी (mental illness) असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान पूजा खेडेकरला २०२० मध्ये मानसिक आजार असल्याचं सर्टिफिकेट अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने दिलं होतं. (IAS Pooja Khedekar)
पूजा खेडकराला २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग सर्टिफिकेट देण्यात आलं होतं, त्यानंतर २०२० मध्ये तिला मानसिक आजारी असल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. शासकीय कायदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील (Ahmednagar District Hospital) तत्कालीन अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – Jammu-Kashmir संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची ताकद वाढणार)
२०२१ मध्ये नेत्र दिव्यांग आणि मानसिक आजारी असे दोन्ही एकत्र करून तत्कालीन मंडळाने पूजा खेडकर यांना बहुविकलांगता सर्टिफिकेट दिल्याचं शासकीय कागदपत्रांमध्ये आढळून आल्याचं नगरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. त्यामुळे याप्रकरणात आता तत्कालीन डॉक्टरांची नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे. (IAS Pooja Khedekar)
नेमकं प्रकरण काय?
पूजा खेडकरची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे, महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरणे अशाप्रकारचे अनधिकृत काम पूजा खेडकर कडून झालं आहे. याशिवाय वरिष्ठांचे दालन ताब्यात घेणे, शिपाई, निवासी संकूल अशा अनेक मागण्या परवानगी नसताना तिने केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर तिची बदली करण्यात आली आहे. (IAS Pooja Khedekar)\
(हेही वाचा – Gautam Gambhir : गंभीरच्या पसंतीच्या सपोर्ट स्टाफवर बीसीसीआयची फुली?)
खेडकरांसाठी आत्मदहनाचा इशारा
दरम्यान, मुलगी आणि आईच नव्हे तर वडिलांवरही गंभीर आरोप आहेत. पूजा यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप झालेले आहेत. दिलीप खेडकर (ex ias Dilip Khedkar) हे सनदी अधिकारी असून अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातल भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गावातील गावकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. तसेच खेडकर कुटुंबावर होणारे आरोप खोटे असल्याचे गावकऱ्यांनी म्हटलंय. दिलीप खेडकर यांना काही झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे. (IAS Pooja Khedekar)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community