राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते, अशी परिस्थिती आहे. सरकारने एका बाजूला अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे, तर नागरिकांचीही मंत्रालयात गर्दी वाढली आहे. अशातच सरकारने राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय प्रशासकी सेवा (भरती) नियम, 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्यात आली आहे. (IAS Promotion)
(हेही वाचा – Silver Price : चांदीच्या किमतीने दिवाळीपूर्वीच गाठला १,००,००० रुपयांचा आकडा, नेमकी कारणं काय?)
या अधिकाऱ्यांना मिळाली IAS पदी बढती
1. संजय ज्ञानदेव पवार
2. नंदकुमार चैतराम भेडसे
3. सुनील बजाजीराव महिंद्रकर
4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
5. नीलेश गोरख सागर
6. लक्ष्मण भिका राऊत
7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार
8. माधवी समीर सरदेशमुख
9. बाळासाहेब जालिंदर बेलदार
10. डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार
11. आण्णासाहेब दादू चव्हाण
12. गोपीचंद्र मुरलीधर कदम
13. बापू गोपीनाथराव पवार
14. महेश विश्वास आव्हाड
15. वैदही मनोज रानडे
16. विवेक बन्सी गायकवाड
17. नंदिनी मिलिंद आवाडे
18. वर्षा मुकुंद लड्डा
19. मंगेश हिरामन जोशी
20. अनिता निखील मेश्राम
21. गितांजली श्रीराम बाविस्कर
22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे
23. अर्जुन किसनराव चिखले
मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. (maharashtra assembly election 2024) राज्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने शासन निर्णयांचा धडाका लावला आहे. गेल्या दहा दिवसांत बाराशेपेक्षा अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. मागील महिनाभरात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकांमध्ये 132 निर्णय घेण्यात आले आहेत. (IAS Promotion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community