Bomb Threat Flight : विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेच्या प्रकरणी आयबी अधिकाऱ्याला अटक

123
Bomb Threat Flight : विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेच्या प्रकरणी आयबी अधिकाऱ्याला अटक
Bomb Threat Flight : विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेच्या प्रकरणी आयबी अधिकाऱ्याला अटक

गेल्या दोन महिन्यांमध्ये विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्यांचे सत्रच सुरू आहे. देशभरातील ८०० पेक्षा जास्त विमानांसंदर्भात अशा धमक्या मिळाल्या आहेत. या संदर्भात काही जणांना अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक जण गुप्तचर विभागाचा (IB) असल्याचे उघडकीस आले आहे. अनिमेष मंडल असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंडल यांनी १४ नोव्हेंबरला नागपूर-कोलकाता इंडिगोच्या विमानात (IndiGo planes) बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती चालक दलाला दिली होती. त्यानंतर विमानाचे छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. विमानात १८७ प्रवासी होते. (Bomb Threat Flight)

(हेही वाचा – No Confidence Motion : इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभा सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; मंजूर होणार का ?)

खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक

तपासानंतर बॉम्बची माहिती चुकीची निघाली. त्यानंतर मंडल यांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिता आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी विशेष न्यायालयाची गरज असते.

मंडल हे उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी असून ते नागपुरात तैनात आहेत. ते निर्दोष असून त्यांना प्राप्त झालेली माहिती दिल्याचे काम त्यांनी केले, असे त्यांचे वकील फैझल रिझवी यांनी सांगितले. मात्र, रायपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी त्याच दिवशी याबाबत आयबीला माहिती दिली होती. (Bomb Threat Flight)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.