IBPS Clerk Bharti 2022 : बॅंकेत नोकरी करायची आहे? IBPS अंतर्गत ६०३५ जागांसाठी बंपर भरती!

108

तुम्ही जर बॅंकेत काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. IBPS बॅंकेअंतर्गत लिपिक पदाच्या ६ हजार ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून शेवटची तारीख २१ जुलै २०२२ आहे. सरकारी बॅंकांमधील हजारो रिक्त लिपित पदे भरण्यासाठी IBPS तर्फे अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून सुरू झालेली आहे.

( हेही वाचा : New Government Scheme : सरकार देणार महिलांना मोफत शिलाई मशीन! वाचा काय आहे योजना)

अटी व नियम

  • पदाचे नाव – लिपिक
  • पदसंख्या – ६ हजार ३५
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधर
  • अर्ज पद्धती – २० ते २८ वर्षे
  • अर्ज शुल्क – सर्वसाधारण/ OBC/EWS – ८५० रुपये, SC/ST उमेदवारांसाठी १७५ रुपये
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १ जुलै २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२२
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

IBPS म्हणजे काय?

IBPS म्हणजे Institute Of Banking Personnel Selection. ही संस्था बॅंकेतील नोकऱ्यांसाठी परीक्षा घेते. या संस्थेद्वारे भारतातील ११ सरकारी बॅंकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. मात्र यामध्ये SBI बॅंक सामील होत नाही, SBI भरतीची स्वतंत्र परीक्षा असते.

कोणत्या बॅंकांमध्ये मिळणार नोकरी ?

  • बॅंक ऑफ इंडिया
  • कॅनरा बॅंक
  • इंडियन ओव्हरसीज बॅंक
  • युको बॅंक
  • सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
  • बॅंक ऑफ बडोदा
  • पंजाब नॅशनल बॅंक
  • युनियन बॅंक ऑफ इंडिया
  • इंडियन बॅंक
  • पंजाब अँड सिंध बॅंक
  • बॅंक ऑफ महाराष्ट्र

New Project

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.