IBPS अंतर्गत विविध तज्ञ अधिकाऱ्यांच्या एकूण ७१० रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. IBPS ने विविध क्षेत्रांसाठी ही जाहिरात प्रकाशित केली आहे. अधिकारी (स्केल – १), कृषी क्षेत्र अधिकारी ( स्केल १), राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि मार्केटिंग अधिकारी इत्यादी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. IBPS SO भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी १ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे.
( हेही वाचा : T-20 World Cup: भारत- बांग्लादेश आमने -सामने; या सामन्यांदरम्यानचे ‘हे’ खास रेकाॅर्ड माहित आहेत का?)
अटी व नियम जाणून घ्या…
- पदाचे नाव – I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी
- पदसंख्या – ७१० जागा
आयटी अधिकारी ( स्केल – १) – ४४
कृषी क्षेत्र अधिकारी ( स्केल-१) – ५१६
राजभाषा अधिकारी ( स्केल – १) – २५
कायदा अधिकारी (स्केल – १) – १०
एचआर/कार्मिक अधिकारी (स्केल-१) – १५
विपणन अधिकारी (स्केल – १) – १०० - अर्ज शुल्क – SC/ST/PWBD – १७५ रुपये/ इतर – ८५० रुपये
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – १ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ नोव्हेंबर २०२२ - अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
परीक्षा दिनांक
- IBPS SO पूर्व परीक्षा २०२२ – २४ आणि ३१ डिसेंबर २०२२
- IBPS SO मुख्य परीक्षा २०२२ – २९ जानेवारी २०२३