रेपो दरवाढीचा परिणाम; या दोन बँकांची कर्जे महागली

रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर, आता कर्जे महागली आहेत. बुधवारी रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 40 आधार बिंदूंची वाढ केल्यानंतर, दुस-या दिवशी म्हणजेच गुरुवारी खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बॅंक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदाने रेपोदराशी संलग्न कर्जांच्या व्याजदरात वाढ केली आहे.

4 मेपासून दरवाढ लागू 

आयसीआयसीआय बॅंकेने ईबीएलआर म्हणजेच बाह्य मापदंडावर बेतलेला व्याजदर 8.10 टक्के केला आहे. नवीन दरवाढ 4 मे 2022 पासून लागू करण्यात आली आहे. तर बॅंक ऑफ बडोदाने तोच दर आता 6.90 टक्के केला आहे. परिणामी, बॅंकेकडून वितरित वैयक्तिक कर्ज आणि गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. हा दर 5 मेपासून लागू करण्यात आला आहे. हा दर रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणावर अवलंबून आणि रेपो दरातील फेरबदलानुसार, परिवर्तित होत असतो.

( हेही वाचा: उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अजानसाठी भोंगे लावणे हा मुलभूत अधिकार नाही )

या बॅंकानीही एमसीएलआरमध्ये केली वाढ

मागच्या आठवड्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा आणि स्टेट बॅंकेने निधी खर्चावर आधारित कर्ज व्याजदरात देखील अनुक्रमे 0.05 टक्के आणि 0.10 टक्क्यांची वाढ केली. खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बॅंक आणि कोटक महिंद्रा बॅंकनेदेखील एमसीएलआरमध्ये प्रत्येकी 0.05 टक्क्यांची वाढ केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here