… तरच कोरोना चाचणी केली जाणार, आयसीएमआरचे नवे नियम!

145

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. झपाट्याने वाढणा-या रुग्णसंख्या लक्षात घेता, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) वेळोवेळी दिशानिर्देश देत असते. आता आयसीएमआरने नुकतेच नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार सरसकट कोरोना चाचण्या करु नका असे सांगण्यात आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असणा-यांचीच कोरोना चाचणी केली जाणार आहे.

सरसकट चाचण्या नको 

बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या, एका राज्यातून दुस-या राज्यात जाणा-या, तसेच जेष्ठ नागरिकांच्या सरसकट चाचण्या न करण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले आहेत. कोरोना चाचण्यांच्या कारणावरुन महत्त्वाच्या शस्त्रक्रिया, प्रसूती व अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये, असे रुग्णालयांना बजावण्यात आले आहे.

( हेही वाचा: रहाणे आणि पुजारा निवृत्त होणार? )

आयसीएमआरचे दिशानिर्देश

  • बाधिताच्या सहवासात आलेल्यांच्या सक्तीने चाचण्या करु नयेत.
  • आंतरराज्य प्रवास करणा-यांना चाचण्यांची सक्ती नाही.
  • कोरोनामुक्त व गृह विलगिकरणात राहणा-यांना चाचण्यांसाठी सक्ती नको.
  • आरटीपीसीआर, टूनेट, सीबीएनएएटी, सीआरआईएसपीआर, आरटीएलएएमपी, रॅपिड माॅलिक्यूलर टेस्टिंग सिस्टिम्स व रॅपिड अॅंटीजन टेस्ट या चाचण्यांना परवानगी.
  • घरीच केलेल्या चाचणीत रुग्ण कोरोना संक्रमित आढळल्यास पुन्हा चाचण्या गरजेच्या नाहीत.
  • सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींची मात्र चाचणी आवश्यक.
  • कोरोना लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या, गर्भवतींच्या व जेष्ठ नागरिकांच्या चाचण्यांसाठी सक्ती नको.
  • रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांच्या चाचण्या आठवडयातून एकापेक्षा जास्त वेळा नको.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.