मुलुंडच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ३५ आयसीयू बेड वाढणार!

अशाचप्रकारे सर्व विभाग कार्यालयांनी कोविड सेंटरमध्ये जिथे आयसीयू वाढवण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे सर्व उपलब्धता आहे, तिथे जर आयसीयू बेड बनवल्यास भविष्यातील जो मोठा धोका वर्तवला जात आहे, त्याची तीव्रता कमी होईल.

173

मुंबईत कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, यामुळे आता घरोघरी उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची मागणीही वाढू लागली आहे. म्हणूनच जंबो कोविड सेंटरसह इतर कोविड सेंटरमधील आयसीयूंची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यामुळे मुलुंडमधील जंबो कोविड सेंटरमध्ये ‘टी’ विभागाच्यावतीने आयसीयू बेड उभारले जाणार असून येत्या शनिवार, रविवारी सुमारे ३० ते ३५ आयसीयू बेड मुलुंडकरांसह आसपासच्या नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे अशाप्रकारे प्रत्येक सहाय्यक आयुक्तांनी पुढाकार घेऊन प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेड वाढवण्याचा प्रयत्न केल्यास, भविष्यातीला मोठा संभाव्य धोका थोडाफार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वेळीच उपचार न मिळाल्याने गमवावा लागतो जीव

मुंबईत मंगळवारी ७२१४ रुग्ण आढळून आले असून, एकूण ८३ हजार ९३४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. मात्र, यापैकी बहुतांशी रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने त्यांच्यावर घरीच होम क्वारंटाईन होत उपचार केले जात आहेत. पण घरी राहून उपचार घेतलेल्या काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यानंतर आयसीयू बेड मिळत नाही म्हणून अनेक रुग्ण घरीच राहत आहेत. परिणामी प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे वेळीच उपचार न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

(हेही वाचाः आता मुंबईतील मैदानांत पुन्हा भरणार ‘बाजार’!)

मुलुंड टी-विभागाच्यावतीने उपाययोजना

मुंबई महापालिकेच्या व खाजगी विविध कोविड रुग्णलयांसह कोविड केंद्रांमध्ये एकूण २५९८ आयसीयू बेड, १० हजार ५१ ऑक्सिजन बेड आणि १३०३ व्हेंटीलेटर आदींची सुविधा उपलब्ध आहे. पण यापैकी ऑक्सिजन बेड काही प्रमाणात रिक्त असले, तरी आयसीयू बेड पूर्णपणे भरले गेले आहेत. त्यामुळे आयसीयू बेडची संख्या तातडीने वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून जंबो कोविड व इतर कोविड केंद्रांमध्ये आयसीयू बेडची संख्या वाढवणे आवश्यक आहे. पण यासाठीची प्रक्रिया विचारात घेता, याला विलंब होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या टी विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी पुढाकार घेऊन मुलुंड कोविड केंद्रामध्ये ३० ते ३५ आयसीयू बेड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची प्रकिया पूर्ण झाली असून, येत्या शनिवार अथवा रविवारी हे आयसीयू बेड रुग्णांसाठी खुले केले जातील. आजवर कोविड सेंटरचे काम हे मध्यवर्ती खात्यामार्फत केले जाते. पण प्रथमच विभागाच्यावतीने हे काम केले जात असून, अशाचप्रकारे सर्व विभाग कार्यालयांनी कोविड सेंटरमध्ये जिथे आयसीयू वाढवण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे सर्व उपलब्धता आहे, तिथे जर आयसीयू बेड बनवल्यास भविष्यातील जो मोठा धोका वर्तवला जात आहे, त्याची तीव्रता कमी होईल,असे बोलले जात आहे.

मुलुंड कोविड केंद्र

सर्वसाधारण खाटा : ७००

ऑक्सिजन खाटा : ७००

आयसीयू खाटा : २०

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.