मुंबईतील सागरी किनारा प्रकल्पात समुद्रातील जीवसृष्टी ध्यानात घेत कृत्रिम ब्लॉकच्या साहाय्याने सी वॉल उभारला जाणार आहे. पालिका, राष्ट्रीय समुद्रीजीव संस्था तसेच वनविभागाचे कांदळवन कक्ष मिळून सी वॉलची उभारणी करणार आहे. सी वॉलची उभारणी केली तरीही मच्छिमारांना उत्पन्न देणा-या माशांच्या प्रजाती या भागांत परतणार नाहीत, या शब्दांत महाराष्ट्र पारंपरिक लघुउद्योग मच्छिमार उद्योगाचे नंदकुमार पवार यांनी आपले दुःख व्यक्त केले.
सुरुवातीला वांद्रे-वरळी भागांत सागरी सेतू उभारल्यानंतर सागरी किनारा प्रकल्पाची व्याप्ती वाढली. या प्रकल्पासाठी केवळ ९० हेक्टर समुद्रातील जागेत लोखंडाच्या सळ्या वापरल्या जातील, असा दावा पालिकेने केला होता. प्रत्यक्षात या जागेची व्याप्ती ९० हेक्टरवरुन ११५ हेक्टरवर केली. सळया उभारण्याची जागा हे माशांचे अंडी घालण्याचे तसेच प्रजननाचे केंद्र होते. या जागांचा -हास झाल्याने खेकडे, शेवण( मोठी कोळंबी), शेवण तसेच जिताडे आदी मासे लुप्त झाले. मच्छिमारांचे आर्थिक नुकसान झाले. आर्थिक नुकसानीची झळ न भरुन निघणारी आहे. सी वॉल ही संकल्पना स्तुत्य असली तरीही प्रत्यक्षात यामुळे मोठा बदल घडणार नाही. समुद्राखाली सी वॉल उभारुनही समुद्री जीवांची हानी भरुन निघणार नाही. या भागांत अजूनही समुद्री प्रवाळ तग धरुन आहेत, एवढीच समाधानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.
( हेही वाचा: ५ लाखांपर्यंतचे उपचार मिळणार मोफत! पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून होईल मोठा फायदा )
Join Our WhatsApp Community