ISRO : ‘अंनिस’चा वैचारिक गोंधळ; इस्रो चंद्रावर पोहोचली, ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्या डबक्यातच

200

कालच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात ‘इस्रो’ने ‘चंद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरवत इतिहास रचला. याबद्दल भारतातच नव्हे, तर जगभरात ‘इस्रो’ आणि ‘चंद्रयान’ मोहिमेत सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहेत; मात्र नेहमीच हिंदु धर्माला पाण्यात पहाणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या वेळीही हिंदु धर्मद्वेष प्रकट करण्याची संधी सोडली नाही. अंनिसवाल्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘चंद्रयान मोहिम यशस्वी होण्यासाठी पूजा, मंत्र, तंत्र, होम हवन उपयोगी ठरणार नसून अचूक तंत्रज्ञानच ही मोहिम यशस्वी करू शकेल’ अशी पोस्ट केली आहे.

‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेशाचे डोस देणारी अंनिस स्वतःला ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांपेक्षा मोठी समजते का? जो धर्माचरण करतो, त्यालाच त्याचे लाभ कळतात. धर्माचरण न करताच ‘त्याने काही लाभ होत नाहीत’, असे म्हणणे ही अंनिसवाल्यांची ‘अंधश्रद्धा’च आहे. ‘इस्रो’ चंद्रावर पोहोचली; मात्र ‘अंनिस’ अजूनही अंधश्रद्धेच्या डबक्यातच आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

प्रत्येक कामाचा आरंभ हा देवतेच्या आशीर्वादाने करणे, त्यातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे, विधी करणे, ही हिंदु धर्मपरंपरा आहे. ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञ हे त्यांची प्रत्येक अंतराळ मोहिम चालू करतांना त्या यानाची प्रतिकृती श्री तिरूपति येथील बालाजी मंदिरात ठेवून पूजाअर्चा करतात, तसेच यान अवकाशात सोडण्यापूर्वीही मुहूर्तावर आणि पूजाविधी करतात. आस्तिक असूनही विज्ञाननिष्ठ असणे, ही भारताची गौरवशाली परंपरा आहे; मात्र ‘देव दिसत नाही, म्हणजे तो अस्तित्त्वातच नाही’ असे समजणार्‍या अंनिसवाल्यांचे हे आंधळेपण आहे. ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांना उपदेश देणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आम्ही निषेध करत आहोत, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा Chandrayaan – 3 : प्रज्ञान रोव्हर १४ दिवसांत काय शोधणार? जाणून घ्या…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.