‘या’ दोन बँकांची कर्जे आणखी महागली

145

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेसह आयडीएफसी फस्ट बॅंकेने आपली कर्जे पुन्हा एकदा महाग केली आहेत. HDFCने आपल्या वेगवेगळ्या अवधीच्या सर्व कर्जांच्या MCLR वर आाधारित व्याजदरात 7 जुलै 2022 पासून 20 आधार अंकांची म्हणजेच 0.20 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि वाहन कर्ज यासारखी सर्व प्रकारची कर्जे महाग झाली आहेत.

एचडीएफसीने एक महिन्याच्या अवधीचा एमसीएलआर वाढवून 7.75 करण्यात आला. तीन महिन्यांच्या एमसीएलआरचा दर 7.80 टक्के, 6 महिन्यांचा 7.90 टक्के, तर 1 वर्षाचा एमसीएलआरचा दर 8.05 टक्के करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एचडीएफसी बॅंकेने गेल्या महिन्यात 7 जून रोजी एमसीएलआरमध्ये 35 आधार अंकांची म्हणजेच 0.35 टक्क्यांची वाढ केली आहे. गेल्या महिन्यातील या वाढीनंतर 2 वर्षांच्या एमसीएलआरचा दर वाढून 8.15 टक्के, तर 3 वर्षांचा एमसीएलआर वाढून 8.25 टक्के झाला होता.

( हेही वाचा: शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र? त्यापेक्षा ठाकरेंनीच प्रतिज्ञापत्र द्यायला हवं )

…म्हणून व्याजदरात वाढ केलीय

आयडीएफसीने एमसीएलआर दरात 10 ते 15 अंकांनी वाढ केली असून, कर्ज 0.1 ते 0.15 टक्क्यांनी महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे देशातील व्यावसायिक बॅंकांकडून कर्जाच्या व्याज दरांत वाढ केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.