दीपावलीत हवेची गुणवत्ता उत्तम रहावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court) ने आक्रमक भूमिका घेतली, विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे मुंबईत पुढील चार दिवसांत हवेची गुणवत्ता चांगली राहिली नाही तर मुंबईतील बांधकामावर बंदी घालण्यात येईल, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिला.
फटाके फोडण्याबाबत नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे
येत्या शुक्रवारपर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांकात (AQI) सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवस बंदी लागू करणार असल्याचे उच्च न्यायालया (Bombay High Court)ने म्हटले. बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहने ताडपत्रीने पूर्णपणे झाकणे बंधनकारक असून फटाक्यांवर बंदी घालण्याची इच्छा नाही असे सांगताना न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांच काटेकोर पालन करा, असेही उच्च न्यायालयाने सांगितले. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी हे सुनिश्चित करावे की फटाके फोडण्याबाबत न्यायालयाच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही. आवाज करणारे फटाके रात्री 7 ते 10 या वेळेतेच वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वेळेबाबत निर्धारित करून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा Lok Sabha Election : हेमा मालिनीच्या मथुरेत कंगना रणौतचा शिरकाव
न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल
मुंबईतील हवा प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी झाली. मुंबईत दिवसेंदिवस खालवत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबाबत न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहता उच्च न्यायालायने सुमोटो याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देंवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. न्यायालयाने या प्रकरणी जेष्ठ कायदेतज्ज्ञ दरायस खंबाटा यांना अमायकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहात तातडीच्या उपाययोजना तात्काळ सुरू कराव्यात असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले.
Join Our WhatsApp Community