राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये होणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सामूहिक कॉपी आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, तसेच दोषी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीत कठोर निर्णय
बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. परीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा – Donald Trump यांनी ॲल्युमिनिअम, पोलादाच्या आयातीवर लावलं २५ टक्के शुल्क)
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी कठोर उपाययोजना
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना पुढील निर्देश दिले आहेत
- परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी
- परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करणे
- विद्यार्थ्यांना कोणतेही कॉपी साहित्य (पुस्तके, नोट्स, मोबाईल इ.) जवळ बाळगण्यास मनाई
- भरारी पथकाद्वारे परीक्षा केंद्रांवर सतत निरीक्षण
- संवेदनशील केंद्रांवर ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या मदतीने देखरेख
- जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक केंद्रावर विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करावी
- प्रत्येक तालुक्यात विशेष प्रमुख आणि उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी
(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करावी; आमदार Sangram Jagtap यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी)
कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्याचा संकल्प
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि परीक्षेला पूर्ण पारदर्शकता मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संबंधित मंत्री उपस्थित होते. राज्यातील परीक्षा केंद्रांवर कठोर कारवाई करून शिक्षणाच्या गुणवत्तेवर कोणतीही गालबोट लागू नये, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community