रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; लवकरच करा ‘हे’ काम, नाहीतर…

रेशन कार्डधारकांनी आधार लिंक न केल्यास धान्य बंद होणार

147

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयामार्फत धान्य वितरण करण्यात येते. अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनांतील लाभार्थ्यांचे आधार सीडिंग करावयाचे प्रलंबित आहे. शासन स्तरावरून २ वर्षे पाठपुरावा करूनही १०० टक्के आधार सीडिंग होत नसल्याने रास्त भाव दुकानदारांमार्फत ई – पॉस मशीनद्वारे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीचे १०० टक्के आधारचे व ई – केवायसीचे काम पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जे नागरिक रेशन धान्याचा लाभ घेतात मात्र रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आतापर्यंत लिंक करून घेतले नाही, अशा आधार लिंक नसलेल्या नागरिकांचे रेशन धान्य बंद करावे लागणार आहे.

(हेही वाचा – Phone Tapping Case: ‘ईडी’च्या कोठडीत असलेले संजय पांडे आता ‘सीबीआय’ कोठडीत)

त्यामुळे तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधारकार्डला लिंक केले आहे का? जर नसेल केले तर ते त्वरीत करा अन्यथा तुम्हाला रेशन दुकानातून धान्य मिळणं बंद होणार आहे. रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी लाभार्थींनी स्वत: रेशन दुकानात आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जाऊन जोडणी करून घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी आवाहन केले.

रेशनकार्डला आधार लिंक केलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय असली तरी सर्वांचे आधार कार्ड लिंक करण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. सातारा जिल्ह्यात रेशन कार्ड शी आधार लिंकची टक्केवारी ९३.३७ असून अद्यापही १ लाख १८ हजार ४७८ नागरिकांचे आधार कार्ड लिंक होणे बाकी आहे. सदर आधार लिंकींग प्रलंबित असण्याची कारणे सबंधित लाभार्थी मयत,दुबार, स्थलांतरित असू शकतात. अशा व्यक्ती प्रत्यक्षात नसुनही त्यांना धान्य अदा केले जाते. तरी हे मयत,दुबार, स्थलांतरित यांची नावे कमी करून नविन गरजू,गरिब लोकांना संधी देण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहिम सुरू केली आहे. तसेच लहान मुले, वयोवृध्द लोकांचे आधार जुळत नाही अशांसाठी तहसिल कार्यालयाद्वारे आधार अपडेशनसाठी कॅम्प लावणेच्या सुचना तहसिलदारांना दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.