आपला देश सुरक्षित असेल तर धर्म, संस्कृती आणि समाज सुरक्षित राहिल. त्यामुळे देशाची सुरक्षा सर्वोपरि असल्याचे प्रतिपादन महंत कमलनयनदास शस्त्री यांनी केले. हिंदुस्थान समाचार बहुभाषी वृत्तसंस्थेच्या सहभाग आणि पुढाकाराने धर्मनगरी अयोध्येत (Ram Mandir) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्यासाठी राष्ट्रहित सर्वोपरि आहे, राष्ट्र असेल तर आपण आहोत, आपली ओळख आहे, मठ-मंदिरे आहेत, धर्म आहेत, कर्म आहेत, उपासना सेवा आहेत. लोकसंख्येतील असमानतेमुळेच पूर्वी आपल्या देशाची फाळणी झाली. आता पुन्हा लोकसंख्येची असामनता प्लेगसारखी वाढत आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या देशासाठी घातक आहेत. भारतमातेवर संकटाचे ढग आहेत, तिचे रक्षण केले पाहिजे. याची तयारी करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यस्त आहेत. जे कलम देशविरोधी आहेत ते हटवले जातील. राष्ट्र एकसंध आणि सुरक्षित असेल तर आपण सर्व सुरक्षित राहिल असे महंत कमलनयन यांनी सांगितले.
(हेही वाचा – Yamuna Expressway: दाट धुक्यामुळे वाहने एकमेकांवर धडकली, विविध ठिकाणी अपघाताच्या घटना )
याप्रसंगी अयोध्येचे खासदार लल्लू सिंह म्हणाले की, रामनगरी अयोध्या सजवली जातेय. जनतेच्या मनातील भक्ती, उत्साह आणि आनंद अवर्णनीय आहे. अयोध्येला जगातील सर्वात मोठे धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्सवाच्या आयोजनातून रामाबद्दल चर्चेची संधी दिल्याबद्दल हिंदुस्थान समाचारचे आभार मानले.
हेही पहा –