आंदोलनाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा फेटाळली आहे. (Maratha Reservation) ”मुख्यमंत्र्यांना थोडा म्हणजे अजून किती वेळ हवा आहे. सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल, तर घेऊ द्या. आपल्या समाजाने खूप अन्याय सहन केला. न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे. आरक्षणासाठी एखादा जीव गेला तरी चालेल.” अशी निर्वाणीची भाषा आज जरांगे यांनी केली. (Maratha Reservation)
‘फक्त पुरावे असलेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा नकार आहे. सरसकट सर्वांना दाखले देण्याची आमची मागणी आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाले पाहिजे’, अशी आग्रही भूमिका मनोज जरांगे यांनी आज मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरावे मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा जरांगे यांनी आज फेटाळली. (Maratha Reservation)
(हेही वाचा – MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घ्या – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश)
माझ्या समाजापेक्षा कुणीही मोठे नाही
मला माझ्या समाजापेक्षा कुणीही मोठे नाही. थोड्या वेळाने ४ घोट पाणी पितो, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पाणी पिण्यास होकार दर्शवला आहे. आज आंदोलनाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली. त्यानंतर अनेक समर्थकांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांना पाणी तरी पिण्याची विनंती केली. या वेळी प्रथम ‘सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल, तर घेऊ द्या’, असे म्हणून जरांगे यांनी पाणी घेण्यास नकार दिला. पाणी पिण्याचा आग्रह करत आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देण्यास प्रारंभ केला. त्या वेळी जरांगे यांनी विनंती मान्य केली.
आंदोलनाचे पहिले ४ दिवस समर्थकांनी अनेक वेळा विनंती करूनही जरांगे यांनी पाणीही घेतले नव्हते. डॉक्टरांकडून औषधोपचार घेण्यासही नकार दिला होता. अखेर आंदोलनाच्या पाचव्या दिवशी २९ ऑक्टोबर या दिवशी रात्री त्यांनी थोडे पाणी घेतले होते. (Maratha Reservation)
‘मराठा भरकटत नाही. आंदोलन शांततेत चालू आहे. शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला कोणीतरी गालबोट लावले आहे. प्रकाश सोळंके यापुढे कधी सोसायटीतही निवडून येणार नाही. १ नोव्हेंबर पासून आंदोलनाचा तिसरा टप्पा चालू होणार आहे’, अशी घोषणा या वेळी त्यांनी केली आहे. (Maratha Reservation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community