रस्त्यांवर धावणारी वाहने तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते. वाहनामधील छोटासाही बिघाड मोठ्या संकटाला आमंत्रण देणारा ठरू शकतो. विशेष करून प्रवासी व मालवाहू वाहनांची फिटनेस तपासणी सक्तीने करणे आवश्यक आहे. ट्रॅव्हल्स, एसटी बसेस ही वाहने लांब पल्ल्याचा प्रवास करतात. त्यामुळे या वाहनांची नियमित देखभाल, दुरुस्ती आवश्यक आहे. बिघाड असलेले वाहन रस्त्यावर धावू लागले, तर यातून सर्वांनाच धोका निर्माण होऊ शकतो.
वाहनांची फिटनेस तपासणी आरटीओ कार्यालयातील ट्रॅकवर इन कॅमेरावर केली जाते. वाहनांच्या हॅन्डब्रेकपासून ते लाईट, टायर व इतर तांत्रिक बाबी अधिकारी तपासतात आणि त्यानंतरच फिटनेस प्रमाणपत्र दिले जाते. वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक मानले जाते. वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास पहिल्यांदा पाच हजार रुपये दंड आकारला जातो. त्यानंतर तर दरदिवशी ५० रुपये याप्रमाणे दंड वसूल केला जातो. प्रवासी व वाहनांमधून नागरिक प्रवास करीत असल्याने जीविताला धोका सर्वाधिक संभवतो. यासाठीच प्रमाणपत्राची सक्ती आहे. याशिवाय वेळेत फिटनेस प्रमाणपत्र न काढल्यास प्रति दिवस ५० रुपये याप्रमाणे लेट फी म्हणून दंड वसूल केला जातो.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसमध्ये कंडक्टरशिवाय मिळणार तिकीट! )
Join Our WhatsApp Communityफिटनेस प्रमाणपत्र आवश्यक
रस्त्यावर धावणारे वाहन हे सुरक्षित असणे आवश्यक आहे. अन्यथा बिघाड असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका असतो. बरेच वाहनचालक देखभाल दुरूस्तीकडे डोळेझाक करतात. त्यासाठीच फिटनेस प्रमाणपत्र आहे. वाहनचालक व मालकाच्या सुरक्षिततेसाठी वाहनांचे फिटनेस करवून घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते.
– सिद्धार्थ ठोके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी