Digital Scams : डिजिटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? सुरक्षिततेसाठी ‘हे’ आहेत ५ महत्त्वपूर्ण उपाय

96
Digital Scams : डिजिटल घोटाळ्याच्‍या जाळ्यात अडकले आहात? सुरक्षिततेसाठी 'हे' आहेत ५ महत्त्वपूर्ण उपाय

सणासुदीच्‍या काळात ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतात, पण फसवणूक करणारे देखील आर्थिक घोटाळे करत ग्राहकांची फसवणूक करतात. उदयास येत असलेले डिजिटल पेमेंट घोटाळे सावधगिरी बाळगणाऱ्या वापरकर्त्‍यांची देखील फसवणूक करू शकतात. नियामक सर्वांसाठी डिजिटल पेमेंट्स सुरक्षित करण्‍याकरिता e-BAAT आणि RBI Kehta Hai यांसारखे उपक्रम राबवत जागरूकतेचा प्रसार करत आहे. पण, असे असूनही फसवणूक झाली तर काय करावे? तुमची फसवणूक झाली असेल तर धोका कमी करण्‍यासाठी सक्रियपणे कार्य करत #SatarkNagrik बनण्‍याकरिता व्हिसा पाच प्रभावी टिप्‍स सांगत आहेत. (Digital Scams)

1. फक्‍त अधिकृत कस्‍टमर केअर सर्विसेसशी संपर्क साधा : 

तुमची बँक किंवा पेमेंट प्रदात्‍याच्‍या अधिकृत संवादामध्‍ये दिलेल्‍या कस्‍टमर केअर क्रमांकावर संपर्क साधण्‍याच्या वेळी अजिबात वेळ वाया घालवू नका. फक्‍त अधिकृतपणे सूचीबद्ध केलेल्‍या कॉन्‍टॅक्‍ट्सशी संपर्क साधा आणि गरज असल्‍यास तुमचे खाते फ्रीज करा किंवा कार्ड/पेमेंट पद्धत ब्‍लॉक करा. यामुळे तुमची अधिक फसवणूक होण्‍याला प्रतिबंध होईल आणि चार्जबॅक किंवा रिफंडसाठी अर्ज करा. (Digital Scams)

(हेही वाचा – Bomb Threats in Flights : भारतीय विमान बॉम्बने उडवण्याची खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी)

2. विलंब न करता तक्रार करा : 

त्‍वरित बँकेला आणि योग्‍य प्राधिकरण जसे नॅशनल सायबर क्राइम हेल्‍पलाइनवर (डायल १९३०) तक्रार करा. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) (National Cyber Crime Reporting Portal (NCRP)) वर किंवा जवळच्‍या पोलिस स्‍टेशनमध्‍ये तक्रार करा आणि तक्रारीची प्रत सोबत ठेवा. (Digital Scams)

3. प्रत्‍येक तपशीलाची माहिती ठेवा :

घोटाळ्याच्‍या गोंधळादरम्‍यान घाबरून जाण्‍यासोबत महत्त्वाच्‍या माहितीकडे दुर्लक्ष होणे स्‍वाभाविक आहे. फसवणूक झाल्‍याचा संशय येताच तपशील व डॉक्‍यूमेंट्स अशी सर्व महत्त्वपूर्ण माहिती लक्षात ठेवा, संवाद रेकॉर्ड करा, स्क्रिनशॉट्स काढा, मेसेज कॉपी करा. तसेच फसवणूक करणाऱ्यांना तुम्‍ही शेअर केलेले व्‍यवहार आयडी, तारीख, रक्‍कम इत्‍यादी कॅप्‍चर करा. ही माहिती फसवणूकीची तक्रार व निराकरण करण्‍यासाठी बहुमूल्‍य ठरेल. (Digital Scams)

(हेही वाचा – Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांनी रेकी करून कामगारांना केले लक्ष्य)

4. सिक्‍युरिटी अपग्रेड करा :

पासवर्ड्स अपडेट करत प्रबळ व युनिक करा आणि तुमची सुरक्षितता वाढवा, टू-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन कार्यान्वित करा आणि अॅण्‍टी-मालवेअर इन्‍स्‍टॉल करा, जे नियमितपणे तुमच्‍या डिवाईसचे स्‍कॅन करू शकते. हे सर्व केल्‍यानंतर प्रबळ सुरक्षितता उपायांसह पेमेंट पर्याय निवड, जसे टोकनायझेशन, जे आरबीआयने ऑनलाइन व्‍यवहारांसाठी अनिवार्य केले आहे. (Digital Scams)

5. समर्थन व जागरूकता :

डिजिटल पेमेंटला बळी पडणे त्रासदायक ठरू शकते. मित्र, कुटुंब, प्रौढ व्‍यक्‍तींना, तसेच सोशल मीडियावर तुमचे अनुभव, आवश्‍यक सुरक्षितता टिप्‍स आणि तुम्‍ही काय चुकीचे किंवा योग्‍य केले त्‍याबाबत अनुभव सक्रियपणे शेअर करा, ज्‍यामुळे त्‍यांना तुमच्‍या अनुभवामधून शिकवण मिळेल आणि ते सावधगिरी बाळगू शकतील. सहयोगाने, आपण अधिक जागरूक राहत, आपल्‍या डिवाईसेसना सुरक्षित ठेवत आणि सूचित व दक्ष राहत आपल्‍या स्‍वत:सोबत आसपासच्‍या व्‍यक्‍तींसाठी सुरक्षित व विश्‍वसनीय डिजिटल इकोसिस्‍टम घडवू शकतो. (Digital Scams)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.