स्मार्ट कार्ड नसेल तर एसटीचे फुल तिकीट काढावे लागणार

एसटी महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार यांच्यासह 29 समाज घटकांना प्रवासी भाड्यात 33 ते 100 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. ही सवलत मिळवण्यासाठी पात्र लाभार्थींकडे एसटीचे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. 30 जूनपर्यंत हे कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

29 समाज घटकांना सवलत 

सुमारे 29 सामाजिक घटकांना 33 ते 100 टक्क्यांपर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह दिव्यांग, कर्करोग व इतर दुर्धर आजारग्रस्त, स्वातंत्र्यसैनिक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हुतात्मा सन्मान योजना, डाॅक्टर आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त,अधिस्वीकृतीधारक पत्रकार अशा विविध सवलत धारकांचा समावेश आहे.

( हेही वाचा: RBI Announcement: क्रेडिट कार्ड UPI ला जोडण्याचा प्रस्ताव; हे आहेत फायदे )

जेष्ठांना मर्यादित प्रवास 

  • राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागिरकांना प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येते.
  • याआधी ज्येष्ठ नागिरकांना केवळ ओळखपत्र दाखवून तिचा लाभ घेता येत होता. आता महामंडळाने सवलत धारकांसाठी स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.
  • ज्येष्ठ नागिरकांना हे कार्ड बनवण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 1 जुलैपासून सवलत धारक ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरता स्मार्ट कार्ड बंधनकारक राहील.
  • त्याचबरोबर स्मार्ट कार्डच्या सवलतीला ही मर्यादा घालून देण्यत आली आहे. ही मर्यादा 4 हजार किलोमीटर आहे.
  • ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी अशी मर्यादा नव्हती. किलोमीटरची मर्यादा घातल्याने ज्येष्ठांचा प्रवासही मर्यादित होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here