Traffic Police : अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन द्याल तर तुरुंगात जाल

411
Traffic Police : अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन द्याल तर तुरुंगात जाल

तुमचा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षांपेक्षा लहान असेल आणि तरीही सर्रासपणे, न घाबरता वाहन चालवत असेल.. तर सावधान! कारण वाहतूक पोलीस आता १८ वर्षांखालील मुलांवर म्हणजे अल्पवयीन मुलांच्या वाहन चालवण्यावर करडी नजर ठेवणार आहेत. (Traffic Police)

वाहतूक पोलिसांकडून अल्पवयीन वाहन चालकांवर जुन्या नियमाची नव्यानं कठोरपणे अंमलबजावणी होऊ शकते. राज्य परिवहन विभागाच्या परिपत्रकानुसार १८ वर्षांखालील व्यक्ती वाहन चालवताना पकडली गेल्यास तब्बल २५ हजारांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एवढंच नाही, तर पालकांना तुरुंगवास होऊ शकतो. (Traffic Police)

पुण्यातील विशाल अग्रवाल ‘हिट अँड रन’ घटनेमुळे अठरा वर्षांखालील वाहन चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल याच्या १७ वर्षांच्या मुलाने रविवारी मद्यधुंद अवस्थेत सुसाट मोटार चालवून एका मोटारसायकलसह चार वाहनांना धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर असलेल्या एका जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे, या अपघातानंतर पुणे पोलिसांना लक्ष करण्यात आले आहे. पुण्यातील येरवडा पोलिसांनी कलम ३०४-(अ) (बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने मृत्यू) कलमात वाढ करून भा.द.वि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) मध्ये वाढ करण्यात आली आहे. (Traffic Police)

(हेही वाचा – Milind Deora: उद्धव ठाकरेंमुळे मला पक्ष सोडावा लागला, मिलिंद देवरा यांनी असा आरोप का केला?)

ही होणार शिक्षा 

या प्रकरणी अल्पवयीन वाहन चालकाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांना या गुन्ह्यात आरोपी दाखवून मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर १८ वर्षाखाली असणारे वाहन चालकावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मोटार वाहतूक नियमानुसार मोटार वाहन कायदा १८० आणि नियम ५ नुसार १८ वर्षाच्या आतील मुलाला वाहन चालविण्यास देणाऱ्या वाहन मालकावर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतूद आहे. १८ वर्षाच्या आतील वाहन चालकाकडून वाहन चालवताना अपघात झाल्यास त्याला वाहन देणाऱ्या व्यक्तीला सह आरोपी करण्यात येते. (Traffic Police)

अठरा वर्षाच्या आतील व्यक्ती वाहन चालवत असताना वाहतूक पोलिसांनी त्याला पकडल्यास त्याच्यासह वाहन देणाऱ्या व्यक्तीला मोटार वाहतूक कायदा कलम १८० आणि नियम ५ नुसार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच १८ वर्षाच्या आतील मुलांकडून गंभीर अपघात होऊन त्यात एखादी व्यक्ती मृत्यूमुखी झाल्यास अल्पवयीन वाहन चालकासह त्याच्या ताब्यात वाहन देणाऱ्या विरुद्ध भा.द.वि कलम ३०४(अ) (बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने मृत्यूस जबाबदार) तसेच मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्यात कमीतकमी ७ वर्षाची शिक्षेची तरतूद आहे. (Traffic Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.